कालीचरण महाराजांच्या पौरोहित्याखाली सामूहिक निकुंभला महायाग संपन्न
पुणे : जगभरातील हिंदूंच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राला विश्वगुरु बनविण्यासाठी पुण्यात श्री सर्वेश्वरी कालिका अगस्तिश्र्वर निकुंभला महायाग समिती तर्फे श्री कालिका अगस्तिश्र्वर निकुंभला हा सामूहिक महायाग झाला. काली पुत्र प.पू.कालीचरण महाराजांच्या पौरोहित्याखाली हा महायाग आयोजित करण्यात आला होता.
एस. एम. जोशी पुलाखाली असलेल्या मुठा नदी पात्रातील मन:शांती दत्त मंदिरात हा याग झाला. यावेळी डॉ. प्रतिमा पासलकर, निवृत्ती जाधव, आण्णा जगताप, राजश्री जोशी आदीच्या उपस्थित व सक्रिय सहभागाने हवन यशस्वीरित्या संपन्न झाले महाराजांसोबत पुरोहित वेदशास्त्री सागर जंगम, पुरुषोत्तम शास्त्री जोशी, वेभव जोशी गुरुजी यांनी सहभाग घेतला. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या यागाचे आयोजन करण्यात आले होते.
या निकुंभला महायागाचे प्रमुख यजमान डॉ. सुनील थिगळे आणि डॉ. हेमा थिगळे हे होते.
तसेच हवनासाठी आळंदीच्या ह .भ. प.भाऊ महाराज फुरसुंगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमारे शंभर निवडक जोडप्यांनी आणि उपस्थित भाविकांनी या हवनाचा लाभ घेतला. या वैशिठ्यपूर्ण हवनासाठी हवनकुंडात एक हजार किलो समिधा आणि आठशे किलो शाकल्याचा वापर करण्यात आला. सनातन हिंदू धर्म रक्षणासाठी या महायागाचे आयोजन केल्याचे मुख्य आयोजक डॉ. प्रतिमा पासलकर यांनी सांगितले.
निकुंभला हवनाचा उल्लेख आपल्याला रामायणात सापडतो. रावणपुत्र मेघनाद याने महासंग्रामाच्या वेळी प्रभू रामावर विजय मिळावा, म्हणून हा हवन करण्याचा प्रयत्न केला होता. जो मारुतीरायाने विझवला आणि म्हणून आज आपण रामविजय साजरा करत आहोत. हवनात ३३ कोटी देव-देवतांचे आवाहन करण्यात आले होते. आधुनिकतेच्या नावाखाली आपल्याला आपल्याच संस्कृतीचे विस्मरण झाले आहे, ती संस्कृती या हवन सारख्या उपक्रमाने पुन्हा एकदा सर्वश्रुत होईल.
भगवान शंकराचे शिष्य महामुनी अगस्त्य ऋषी यांना आपल्या गुरुंकडून म्हणजे श्री शंकरांकडून या हवनाची दीक्षा मिळाली आणि श्री महाराजांना म्हणजे कालीपुत्र प.पू कालीचरण महाराजांना आपल्या गुरूंकडून या हवनाचा कलियुगात अधिकार प्राप्त आहे, कारण काली पुत्र कालीचरण महाराज हे महामुनींचे प्रत्यक्ष मंत्र दीक्षित शिष्य आहेत.
