Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मोदी यांच्या 400 पार हा नारा पूर्ण होणार हा विश्वास युवकाच्या उत्स्फूर्त प्रतीसादामुळे अधोरेखित

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मित्र पक्षातील युवा नेतृत्व आणि कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. या युवा संवाद संमेलनाला जनतेचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. उद्याच्या भविष्यासाठी आजचा युवा सज्ज झाला आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निर्धाराने मोठ्या संख्येने पुढाकर घेत आहे. उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार हा नारा पूर्ण होणार हा विश्वास युवकाच्या उत्स्फूर्त प्रदिसादामुळे अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया अर्चना पाटील यांनी दिलीय.

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सकारात्मक कार्यासाठी, देशहिताच्या धोरणासाठी नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुतीची नवक्रांती घडविण्याचा संकल्प या महायुती महासंमेलनात झाला.

या युवा मेळाव्यात 18 ते 25 वायोगटातील तरुण – तरुणी देशाच्या नवनिर्माणाच्या या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत व त्यामधून लोकशाही बळकट करण्याकरिता पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प सर्व युवकांनी केला.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, सुरज चव्हाण, धनंजय सावंत, नितीन काळे, युवा नेते मल्हार पाटील, सुरज साळुंके, शरद पाटील, आकांक्षा चौगुले, नितीन लांडगे, अरुण पाटील, श्रीकांत शिंदे, अविनाश ठाकरे, शंतनू खंदारे, गणेश जगताप, दिग्विजय शिंदे, राजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading