Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पोलिस आमच्याच नेत्यांना पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत – युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा आरोप

पुणे : जेथे‌ जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेततेथे तेथे काँग्रेसच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिस प्रशासन धमक्या देत आहे. आमच्या लोकांना प्रचारासाठी घराच्या बाहेर पडू दिले जात नाहीअसा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केला.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीमाजी आमदार उल्हास‌ पवारप्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड,  राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राउत, प्रदेश प्रभारी उदय भानू व रोहित कुमार, सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.

राऊत म्हणालेराज्यातील अनेक कंपन्या गुजरातला नेल्यापेपर फुटीचे प्रकार घडत आहेतअशा घटना रोखण्यासाठी धोरण करणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांना भरपाई देणे गरजेचे आहे.

देशात बेरोजगार युवकांची‌ संख्या वाढत आहे. दहा हजाराच्या नोकरीसाठी इंजिनिअर फिरतात. पीएचडी झालेले आणि एमपीएससी अभ्यास‌करणारे विद्यार्थी सरकारच्या धोरणामुळे नैराश्येत आहेत. न्याय‌ पत्रात काँग्रेसने युवकांसाठी अनेक‌ योजना आणल्या आहेत.

भारत मोठा की मोदी मोठेमोदी‌ सरकारमोदींची गॅरंटीयुवक मंत्रीशिक्षण मंत्री व इतर विभागाचे मंत्री कोण आहेतहे कोणाला माहिती नाही. केवळ मोदी सरकार मोदी सरकार केले जाते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली दहा हजार कोटीचे‌ एक सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले. सरकारी यंत्रणा भाजपसोबत आहे. पोलिस आमच्या नेत्यांना फोन करून धमकी देतातनिवडणुक सुरू आहेमग आम्ही काम कसे‌ करायचे. पोलिस आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना प्रचारासाठी घराबाहेर निघूच देत नाहीत. मोदींची जिथे‌ जिथे सभा होत आहेततिथे हे प्रकार सुरू आहेत.

 

गडकरी एक लाखाने पराभूत होतील :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहा वर्षात नागपूरसाठी एकही इंडस्ट्री किंवा कंपनी आणली नाही. त्यांनी केवळ आगोदर मंजुर झालेली विविध महाविद्यालये दुसरीकडे नेलीबाकी काही केले नाही. त्यामुळे नागपुरातून गडकरी यांचा एक लाख मताच्या फरकाने पराभव होणार आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या‌ मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास पंन्नास ते साठ हजाराचे लीड मिळेलअसेही कुणाल राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading