एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने योनेक्स-सनराईझ एसबीए कप सुपर ५०० सिंगल्स रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ ते ५ मे दरम्यान शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे, अशी माहिती सुधांशू बॅडमिंटन अकॅडमीचे संचालक सुधांशू मेडसीकर यांनी दिली.
ही स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. त्यानंतर पुरुष, महिला एकेरी मध्ये देखील मोठी स्पर्धा असणार आहे. ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० वर्षांवरील गटातही ही स्पर्धा होणार आहे.
यातील विजेत्यांना ट्राॅफी आणि रोख पारितोषिक दिले जाणार आहे. यात केवळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. तब्बल ४९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
मानांकन यादी : पुरुष एकेरी – चैतन्य खरात, प्रणव गावडे.
महिला एकेरी – सिया बेहेडे, श्रुती कुलकर्णी.
११ वर्षाखालील मुले – अद्वैत फेरे, कबीर देसाई
मुली -दिवशा सिंग, वल्लरी वाटाने
१३ वर्षाखालील मुले- रझा सोमजी, रिदान पडवे
मुली – आराध्या ढेरे, कायरा रैना
१५ वर्षाखालील मुले – विराज सराफ, रझा सोमजी
मुली – शरयू रांजणे, शर्वरी सुरवसे
१७ वर्षाखालील मुले – सुदीप खोराटे, ओजस जोशी
मुली – यशस्वी काळे हृदया साळवी
१९ वर्षाखालील मुले – सिद्धार्थ कोल्हाडे,शार्दुल अवारी
मुली – संस्कृती जोशी, एस. डाखणे
