Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Weather forecast : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा देण्यात आला आहे. अन त्याच वेळी अवकाळी पावसाची देखील अवकृपा राज्यावर होत आहे. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुण्यासह सातारा, छ. संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे जरी राज्यात पाऊस पडत असला तरी देखील अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. वाशिममध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, वाशिमचं तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading