Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार

परभणी : राज्यात लोकसभा निवडणूक सुरू असून दोन टप्प्यातील मतदान देखील झाले आहे. या निवडणुकीपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे दूर राहिले असले; तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे पाटलांचा मोठा प्रभाव असणार आहे. कारण विधानसभेला मनोज जरांगे पाटील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी याबाबाद घोषणा केली आहे.

शहागड इथे मतदान केल्यानतंर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण उपचार सुरु असतानाही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी ते रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड इथल्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर मतदानासाठी आले होते. मतदान केल्यानंतर इथं त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी जरांगे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिलेले नाहीत. पण आम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला सर्व २८८ जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी त्यांनी लोकसभेला आपला कोणालाही पाठिंबा नाही, पण कोणाला मतदान करायचं हे मराठ्यांना बरोबर माहिती आहे, असं त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत सामाजिक आघाडी केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे पाटील वंचित सोबत जाणार की नाही?, हे पहावे लागेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading