Lok Sabha Election 2024 : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजप कडून उमेदवारी
मुंबई : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) विरूद्ध उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळणार आहे.
नुकतेच कॉँग्रेस कडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर भाजप कडून या मतदारसंघात निवडणुकीसाठी कोणाला उभे करणार याबाबाद उत्सुक्ता होती. त्यानंतर आज भाजप कडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान, यामुळे येथील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपने नव्या चेहऱ्याला संधी दिली असल्याचे बोलले जात आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. विशेष म्हणजे, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या खून प्रकरणात देखील उज्ज्वल निकम यांनी वकील म्हणून काम पाहिले आहे.
