Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

लवकरच आढळराव पाटलांचा प्रचार करणार – दिलीप वळसे पाटील

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी महायुतीतील सर्व नेते प्रचारात दिसत असले तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, मंत्री दिलीप वळसे पाटील कुठेही दिसत नाहीत यावरून चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. आता एका वृत्त वाहीनीशी बोलताना त्यांनी आढळराव पाटील जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.

मागील महिन्यात झालेल्या अपघातानंतर आजारी असल्याने प्रचारात नव्हतो, मात्र तब्येत बरी झाल्यानंतर आढळराव पाटलांचा प्रचार करणार असल्याचे सांगत आढळराव पाटील शंभर टक्के विजयी होतील असा विश्वास वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

या विषयी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझी प्रकृती आता एकदम उत्तम आहे. गेल्या 15 दिवसांत त्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. अजुन थोडी सुधारणा झाल्याबरोबर मी माझ्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार देखील करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading