Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अनंत गिते यांच्याविरोधात मतदारसंघात बॅनरबाजी

रायगड : गेल्या काही दिवसापासून रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक वार सुरू झाला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला असून एकमेकांवर जोरदार टिकाटिप्पणी सुरू झाली आहे. अशातच आता अनंत गिते यांच्याविरोधात मतदारसंघात बॅनरबाजी बघायला मिळत आहे. त्यामुळे अनंत गीते यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गिते यांच्याविरोधात ठिकठिकाणी बॅनरबाजी बघायला मिळत आहे. यावर अनंत गिते साहेब तुम्ही रायगड लोकसभेचे ३० वर्ष खासदार होतात, त्यावेळी तुम्ही आणि तुमचा विकास आमच्या मोर्बा गावापर्यंत पोहोचलाच नाही. परंतु तुम्ही आज आमच्या गावापर्यंत पोहोचत आहात, त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत आहे. एक मोर्ब्याचा मतदार, अशा आशायचे बॅनर मतदारांकडून लावण्यात आले आहेत.

तर काही ठिकाणी मागील ३० वर्षापासून बेपत्ता असलेले रायगडचे माजी खासदार अनंत गिते सापडले असून आज त्यांचे मोर्बा येथे आगमन होणार आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. असं म्हणत अनंत गिते यांच्यावर मतदारांनी रोष व्यक्त केलाय.

दरम्यान,  शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. अनंत गिते या मतदारसंघातून १९९६ साली पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर पाच वेळा त्यांनी रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व केले होते. तर केंद्रात अनंत गिते यांनी ऊर्जा आणि अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभारही त्यांनी सांभाळला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading