दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – ४५.९५ टक्के,
अकोला -४२.६९ टक्के,
अमरावती – ४३.७६ टक्के,
बुलढाणा – ४१.६६ टक्के,
हिंगोली – ४०.५० टक्के,
नांदेड – ४२.४२ टक्के,
परभणी -४४.४९ टक्के,
यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के
