फ्रेमबॉक्सच्या विद्यार्थ्यांनी साकारले विविध चित्रपट आणि गेमिंगचे सेट्स..
आशिष कुलकर्णी म्हणाले, अॅनिमेशन, व्हीएफएक्स साकारताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला आहे. यासाठी कथाकथन आणि ललित कले बरोबर तंत्रज्ञानाचा वापर खुबीने केलेला दिसून येतो. या सर्व कलांचा अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांनी निरीक्षण, विचार, कल्पना, अनुभव, प्रयोग, निर्मिती आणि पुनःनिर्मितीची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. फ्रेमबॉक्सच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा पाया अतिशय मजबूत केला आहे. तंत्रज्ञान आणि नवीन घडामोडींसह अद्ययावत राहण्याचा सल्ला कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
राजेश तुराखिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती या वार्षिक कला प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या गेल्या ज्यामुळे पालकांसह या क्षेत्रातील दिग्गजांना याचा आनंद घेता आला. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री मार्केट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीसह इतर AVC म्हणजेच अॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स या सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
