Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

इंडस ॲपस्टोअरतर्फे १० भारतीय भाषांमध्ये व्हॉईस सर्च फीचर लाँचची घोषणा

पुणे २४ एप्रिल २०२४: फोनपेच्या इंडस ॲपस्टोअर या भारतातच विकसित झालेल्या ॲप मार्केटप्लेसने आज इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हॉइस सर्च फीचर लॉन्च केल्याची घोषणा केली. या नव्या फीचरमुळे युजरला एक वेगळाच अनुभव मिळतो. युजरना त्यांच्या आवडीच्या भाषेत व्हॉइस सर्च करून ॲप सर्च करता येतात. व्हॉइस सर्च तंत्रज्ञान हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमद्वारे समर्थित आहे, या तंत्रज्ञानात विविध उच्चार आणि नमुने अचूकपणे समजून घेऊन त्यानुसार संबंधित परिणाम ऑफर केले जातात.

इंडस ॲपस्टोअरचे सह-संस्थापक आणि सीपीओ आकाश डोंगरे म्हणाले की , “नवीन व्हॉईस सर्च फीचर म्हणजे सर्वसमावेशक आणि ॲक्सेस करता येणारे ॲप स्टोअर तयार करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न केला आहे. ८२ टक्के स्मार्टफोन युजर व्हॉइस-ॲक्टिव्हेटेड तंत्रज्ञानामध्ये गुंतलेले आहेत, भारतीय भाषांचे एकत्रिकरण हे सहा ते साठ वयोगटासाठी हे तंत्रज्ञान सर्वात चांगले आणि विकासित होणारे आहे. हे युजरला केंद्रस्थानी ठेवणारे फीचर इंडस ॲपस्टोअरला परिवर्तनशील अशा या दशकाची गरज असलेल्या व्हॉईस तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवते.”

भारतात अंदाजे ७५ टक्के इंटरनेट युजर हे स्थानिक भाषा बोलतात. इतक्या मोठ्या संख्येतील युजरना त्यांच्या भाषेत ॲप सर्च करता येणे आणि त्यामध्ये त्यांना हवा तसा वेळ घालवता येणे ही मोठी गरज आहे. नेहमीच्या टेक्स्ट पद्धतीने प्रादेशिक भाषांमध्ये सर्च करताना, विशेष वेगळा कीबोर्डची गरज आणि अवघड अक्षरांची रचना यांसारख्या विविध अडचणी येतात. या अडचणींमुळे नीट संवाद होऊ शकत नाही.

इंडस ॲपस्टोअरच्या व्हॉईस सर्च तंत्रज्ञानामुळे युजर आता केवळ व्हॉईस सर्च बटणावर टॅप करून त्यांच्या स्थानिक भाषेत शोध परिणाम मिळवू शकतात. यामुळे युजरना एक खूप चांगला अनुभव मिळणार आहे. विविध स्तरावर साक्षरता आणि भाषिक प्राधान्ये यांची पूर्तता करून, सर्वसमावेशक आणि ॲक्सेस करता येणाऱ्या फीचरसह युजरना सक्षम करून इंडस ॲपस्टोअरच्या ध्येयाशी हे संरेखित करते. इतकेच नाही, तर हे नवीन फीचर ॲप डेव्हलपरसाठी एक सकारात्मक वाढ ठरत आहे, कारण यामुळे ॲप इंस्टॉलला चालना मिळते आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading