क्रेडाई महाराष्ट्र आणि दिशा फाऊंडेशन यांचा महाराष्ट्रातील ३०,००० बांधकाम कामगारांसाठी
पुणे : क्रेडाई महाराष्ट्र, राज्यातील संघटित रिअल इस्टेट डेव्हलपर्स/बिल्डर्सची सर्वोच्च संस्था आणि दिशा फाऊंडेशन, एक प्रमुख ना-नफा संस्था, यांनी बांधकाम कामगारांसाठी सामाजिक संरक्षण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (बीओसीडब्लू) योजना आणि त्याचे फायदे, इतर आवश्यक सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक साक्षरता, कायदेशीर मदत आणि कौशल्य वाढीच्या संधींसह सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करून कामगारांना सक्षम करणे आहे.
दिशा फाऊंडेशन या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्र आणि त्याच्या शहरी विभागांशी संलग्न होऊन कार्य करेल. ते संसाधने एकत्रित करून कामगारांना प्रशिक्षण देतील व त्यांना जागरूकता करतील, तसेच पात्र बांधकाम कामगारांचा बीओसीडब्लू आणि इतर विविध योजनांमध्ये समावेश करतील आणि सॉफ्टवेअर नोंदणी प्रणाली वापरून डेटा व्यवस्थापन करतील. क्रेडाई महाराष्ट्र आणि त्याचे शहरी विभाग कामगारांच्या नोंदणीची सुविधा तसेच कामगार विभागाशी समन्वय साधणे आणि या उपक्रमाची शाश्वतता सुनिश्चित करून अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करतील.
कामाच्या पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्रातील क्रेडाईच्या 66 शहरी भागांमध्ये किमान 30,000 बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.यामध्ये अल्प -उत्पन्न तसेच अकुशल आणि अर्ध-कुशल या कामगारांचा समावेश आहे कामाचा पहिला टप्पा छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांमध्ये सुरू होणार आहे.
कल्याणकारी योजनांचा आणि अत्यावश्यक सेवांचा जास्तीत जास्त कामगारांना लाभ मिळवून देणे हे क्रेडाई महाराष्ट्र आणि दिशा फाऊंडेशन यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर उपक्रम बांधकाम कामगारांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल.
“महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (बीओसीडब्लूच्या) कल्याणकारी योजना आणि इतर योजनांच्या फायद्यांसह बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी क्रेडाईचे दिशा फाउंडेशनसोबतचे सहकार्य हा महत्वाचा दुवा ठरेल. यावर्षी 30,000 हून अधिक बांधकाम कामगारांना या उपक्रमाचा थेट फायदा होईल, त्यांना बीओसीडब्लू योजनेंतर्गत आणि इतर कल्याणकारी उपक्रमांतर्गत अत्यंत आवश्यक सहाय्य मिळेल” , असे व्यक्तव्य क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री प्रमोद खैरनार पाटील यांनी केले.
डॉ. अंजली बोऱ्हाडे, दिशा फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा यांनी “क्रेडाई महाराष्ट्रसोबत आमचे प्रयत्न तळागाळातील पात्र बांधकाम कामगारांना BOCW आणि इतर सामाजिक संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे” असे संबोधन केले.
“क्रेडाई महाराष्ट्र आणि दिशा फाउंडेशन यांच्यातील सहकार्यामुळे बांधकाम उद्योगात सामाजिक जबाबदारीचे एक नवीन पर्व सुरू झाले आहे. बांधकाम कामगारांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या उपक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे”. असे विधान विद्यानंद बेडेकर, क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव यांनी केले.
या प्रसंगी, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव तथा OB Incharge- Sports & CSR Events Committee and Labour Welfare & Skill Development Commitee, धर्मवीर भारती हे उपस्थित होते.
अमित वाघमारे, Convenor- Sports & CSR Events Committee आणि सुनील पाटील, Convenor- Labour Welfare & Skill Development Committee तसेच Committee Co-Convenors गोपेश यादव, प्रतीश गुजराथी, मंगेश हिरावे, नरेंद्र कुलकर्णी, संदीप मिरजकर, दीपा पटारे, अमीना मुल्ला आदी सर्व येत्या १ मे २०२४ पासून एक वर्षापर्यंत हे अभियान ६६ शहरे व त्यांच्या अध्यक्षांच्या मदतीने यशस्वी व प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
