Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ईशान्य मुंबईत भाजपाला निवडणुक आयोगाचा दणका

भाजपाचा प्रचार करणा-या तीन वाहनांवर कारवाई.

मुंबई दि. 20 (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची जाहिरात करुन आचासंहितेचा भंग करणा-या वाहनांवर मुलुंड पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले. त्यामुळे परवानगी न घेता वाहनांवर अशी जाहिरात करणा-याना चांगलीच चपराक बसली आहे.

निवडणुक आयोगाची परवानगी न घेता पक्षाची जाहिरात करणा-या भाजप कार्यकर्त्यांना निवडणुक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार व देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले चित्र तीन वाहणांवर लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग करीत प्रचार करीत असल्याची तक्रार नितीन काळे यांनी निवडणुक आयोगाकडे केली होती. यावर कारवाई करीत मुलुंड पोलिसांनी संबंधीत तीन वाहने ताब्यात घेत भाजपचे कार्यकर्ते मनिष गोरी, हरमेलसिंग मान व हर्ष व्होरा यांच्यावर गुन्हे दाखल केले. परवानगी न घेता मनमानी करणा-या भाजप समर्थकांना निवडणुक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading