Lok Sabha Election 2024: बारामती निवडून आणण्यासाठी दादांचा भरवसा PCMCवर
पुणे : राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीची लढत ही अतिशय अटीतटीची होणार आहे. पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत असल्याने महायुतीसह महाविकास आघाडीने देखील प्रचाराला चांगलीच धार लावली आहे. अशातच आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून बैठकांचा सपाटा लावला आहे.
पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवत असलेल्या सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार स्वतः जातीने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मतदारसंघातील विविध भागांमध्ये सभा, मेळावे, कोपरसभा, मतदारांसोबतच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यातच आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मिशन बारामती सोपवलं आहे. याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहारातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे मिशन बारामती सोपवली आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर बारामतीची लढत आता प्रतिष्ठेची झालीय. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू केलीय. याचाच भाग म्हणून अजित पवार गटाकडून पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्याना भोर वेल्हा मुळशीची जवाबदारी देण्यात आलीय. गेल्या महिन्यात वारामती लोकसभा मतदारसंघातील भोर वेल्हा मुळशी भागातील नागरिकांचा मेळावा घोटावडे फाटा येथे झाला. या मेळाव्याला माजी नगरसेवक मयुर कलाटे, भोसरीचे माजी आमदार विलास लाडे, पिंपरी-चिंचवडचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बारामती मतदारसंघ पिंपरी चिंचवड शहाराच्या हद्दीपर्यंत असून मुळशी भोर वेल्ह्यात पिपरी शहरातील अनेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे नात्यागोत्यांचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरविण्यासाठी गावकी भावकीच्या मताची बेरीज करण्यासाठी अजित पवारांनी बारामती मतदारसंघातील भोर वेल्हा मुळशी तालुक्यांची जबाबदारी आपल्या गटाच्या पदाधिकान्यांकडे दिलीय
