Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

सॅनी इंडिया आणत आहे SKT105E, भारतातील पहिला इलेक्ट्रिक ओपन कास्ट मायनिंग ट्रक

पुणे : सॅनी इंडिया ही बांधकाम व खाणकाम उत्पादनांच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची उत्पादन कंपनी SKT105E हा आपला इलेक्ट्रिक डम्प ट्रक अभिमानपूर्वक सर्वांपुढे आणत आहे. भारतात उत्पादन झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच ट्रक आहे. सॅनीच्या पोर्टफोलिओत नव्याने दाखल झालेले हे चाकोरीबाह्य उत्पादन राष्ट्राच्या खाणकाम उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे उत्पादन सर्वांपुढे आणण्याचा सोहळा सॅनी इंडियाच्या अत्याधुनिक आस्थापनेत झाला. सॅनीच्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्गअनेक मान्यवर पाहुणे आणि उद्योगक्षेत्रातील दिग्‍गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

SKT105E इलेक्ट्रिक डम्प ट्रक खाणकाम तंत्रज्ञानातील नवीन युगाचे प्रतिनिधत्व करतो. स्थानिक कौशल्य आणि जागतिक नवोन्मेष यांची सांगड घालून या ट्रकचे उत्पादन करण्यात आले आहे. ओपन-कास्ट खाणकाम कार्यांच्या काटेकोर मागण्याची पूर्ण करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला हा पूर्णपणे इलेक्ट्रिक कच्च्या रस्त्यांवर चालणारा (ऑफ-हायवे) डम्प ट्रक अपवादात्मक इंधन कार्यक्षमता व किफायतशीरतेची ग्वाही देतो. ७० टन एवढ्या उत्तम भारवाहक क्षमतेसह हा ट्रक देशातील खाणकाम उद्योगांसाठी मोठे बलस्थान ठरणार आहे. 

दीपक गर्ग यांनी समारंभातील भाषणातभारतात शाश्वत खाणकाम पद्धतींना चालना देण्याच्या दृष्टीने SKT105Eचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,  “SKT105E बाजारात आणणे हा सॅनी इंडियासाठी आणि भारतातील खाणकाम उद्योगासाठी ऐतिहासिक क्षण आहे. उत्पादनाचे स्थानिकीकरण करून तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान आणूनआम्ही कामकाजातील कार्यक्षमता तर वाढवत आहोतचशिवाय देशाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीतही योगदान देत आहोत.

SKT105Eच्या नवोन्मेषकारी रचनेला शून्य-उत्सर्जन कार्याची जोड मिळाल्यामुळे खाणकाम उद्योगांसाठी हे पर्यावरणपूरक उत्पादन आहे. या उत्पादनातील प्रगत इलेक्ट्रिक प्रणोदन (पुढे ढकलण्याची) प्रणालीमुळे कामगिरी उत्तम होते आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते. त्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी हे उत्पादन सुसंगत आहे. 

शिवायस्थानिक उत्पादन क्षमतांची जोपासना करण्याप्रती तसेच राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्याप्रती सॅनी इंडियाच्या बांधिलकीवरही श्री. गर्ग यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, “SKT105E ही ‘मेक इन इंडियाप्रती सॅनी इंडिया दाखवत असलेल्या बांधिलकीची पावती आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन करून आम्ही रोजगाराच्या संधी तर निर्माण करतोचशिवाय एतद्देशीय उत्पादन परिसंस्थाही भक्कम करतो.

या कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे व उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसह सॅनी इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारीकर्मचारीकामगार उपस्थित होते. मायनिंग बिझनेस युनिटचे प्रमुख सौरो रायसॅनी इंडियाचे सीओओ संजय सक्सेनासॅनी समूहाचे उपाध्यक्ष डॅरील लीनफॅक्टरी ऑपरेशन्सचे संचालक सुनील मोरे आणि कस्टमर सपोर्ट व आरअँडडीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप लारोइया यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading