राज्यपाल्यांच्या आदेशाला सामाजिक न्यायविभागाची केराची टोपली?
पुणे : राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीती बाबत उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या मदती संदर्भात अनेक वेळा राज्यपाल महोदयास स्टुडंट हेल्पींग हँडस संस्थेने पत्रव्यवहार केले आहेत.राज्यपालांच्या अवर सचिव विनायक गवाणकर यांच्या रितस्तर पत्राला सामाजिक न्याय विभागाने तीन महिने होउनही अजुनही उत्तर दिले नाही. अशी माहिती स्टुडंट हेल्पींग हँडसचे संस्थापक अँड.कुलदीप आंबेकर यांनी दिली.
अँड.कुलदीप आंबेकर म्हणाले, स्टुडंट हेल्पींग हँडस संस्थेने दुष्काळाच्या विषयी विद्यार्थ्याचे होणारे हाल याबाबत ईमेलद्ववारे माहीती राज्यपालास कळवली.
राज्यपालांनी याबाबत तात्काळ दखल घेउन दुष्काळग्रस्त विद्यार्थ्याच्या प्रश्ववरती कार्यावाही करा.असे स्पष्ट आदेश इमेलदवारे दिलेत.
परंतू समाजकल्याण विभाग यावरती काहीही भुमिका घेत नाही.हा विषय जर त्यांच्याकडे असेल नसेल यांचीही माहीती त्यांनी अध्याप का दिली नाही.?
दुर्दवींची बाब म्हणजे अंत्यत ज्वलंत विषय असताना हे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांवरती मदती अभावी उपासमारीची वेळ आली असताना शासन मात्र मोठ्या वल्गना करतेय.प्रत्यक्ष मात्र साधी दूष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना राज्यपाल भेट देत नाहीत. समाजकल्याणही सहकार्य करत नाही.आम्ही न्याय मागणार तरी कोणाला!! असा सवाल अँड.कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.
