पुणे : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा वाहिनी यांनी आज सकाळी दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती केली. दर्शनानंतर अजित पवार यांना गणपती बाप्पांकडे काय मागितलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर यश, विजय देवाकडे मागितला असं अजित पवार म्हणाले. “महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी गणरायाने आशिर्वाद द्यावेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, त्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, अशी प्रार्थना दगडूशेठ गणपतीच्या चरणी केल्याच” अजित पवार यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले. “आज उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहायच हे ठरलय. हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगली, साताऱ्याला जाणार. उद्या धाराशिवला जाणार. शक्ती प्रदर्शन वैगेरे काही नाही. अर्ज भरताना उपस्थित राहण्याच आवाहन केलय. फॉर्म भरल्यानंतर सभा होईल. त्यानंतर नेते आपआपल्या कार्यक्रमाला जातील” असेही त्यांनी सांगितले.
इंदापूर येथे सभेत अजित पवारांनी ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. विरोधक अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. आज अजित पवार यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. पवार म्हणाले, आता कुठल्या गोष्टीत ‘ध चा मा’ करु नये. मी तिथे गंमतीने म्हटलं. समोर डॉक्टर, वकील होते. ती जाहीर सभा नव्हती, मर्यादीत लोकांची सभा होती. जाहीरनाम्यात बरच काही सांगितलं जातं. मग ते प्रलोभन दाखवतायत का? निधी देत असताना, विकासकामाला रस्ते, विकासाल निधी देण्याच आमदार, खासदाराच काम असतं. आमचा सांगण्याचा प्रयत्न हाच असतो की, मागे ज्याने काम केलं, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही करु. हे साध सरळ गणित आहे. मी विचार करुनच बोलतो. आचारसंहितेत जे नियम घालून दिले आहेत, त्याचा माझ्याकडून भंग होऊ नये, याची खबरदारी घेत असतो. राहुल गांधींनी म्हटलेलं की, खटाखटा गरीबी हटवू, मी आपल्या ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं, उगाच कोणी त्यावरुन बाऊ करु नये”