Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Baramati : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार

बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या १८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नणंद विरुद्ध भावजय अशी जरी ही लढाई असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असणार आहे.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे तर खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.
दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील १८ एप्रिललाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतले आहे. १८ एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारदेखील मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज खरेदी करण्यात आला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटांकडून आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या डमी उमेदवार असल्याचे समजते, त्यांच्या नावाने लक्ष्मीकांत खांबिया यांनी अर्ज घेतला आहे.  बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत १९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. १८ एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading