Weather updates : मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई : मुंबई, रायगड आणि ठाणे यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये 15 एप्रिल आणि 16 एप्रिल रोजी कमालीचे तापमान असणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा, IMD ने सोमवारी दिला आहे. मुंबईसाठी IMD च्या प्रादेशिक अंदाजानुसार, तापमान 38 अंशांच्या दरम्यान असेल, असा अंदाज वर्तवला आहे. या व्यतिरिक्त, IMD ने उत्तर गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने सोमवारी मुंबई, रायगड आणि ठाण्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान अंदाज नुसार, या महाराष्ट्रातील शहरांमध्ये 15 आणि 16 एप्रिल रोजी कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
IMD च्या दैनंदिन हवामान बुलेटिंगनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या भागांसाठी, सोमवारी शहर आणि उपनगरात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती असलेले आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३९ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.