Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सुनील तटकरेंच्या प्रचार कार्यालयाचं पार पडलं उद्घाटन, महायुतीचे नेते उपस्थित

रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्यात. यातच रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने अनंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. दोन्ही बाजूने सध्या प्रचाराचा धडाका सुरू केलया. अशातच सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाच आज मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, रिपाई, मनसे आणि इतर मित्रपक्षाने संघटनांचा समावेश आहे. सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी महायुतीतील या सगळ्या पक्ष आणि संघटनांनी कामाला जोरदार सुरुवात केली आहे. अशातच आज रोहा येथे रायगड लोकसभेची उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मंत्री  अदिती तटकरे यांच्या उपस्थित करण्यात आले. सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्याने रायगड लोकसभेतून विजयी करा. त्यासाठी जोमाने काम करावे लागणार असे आवाहन अदिती तटकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना केले. यावेळी महायुती मधील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात सध्याचं राजकीय वातावरण कसं आहे. यावर तटकरे यांचा विजय अवलंबून आहे.  तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत देखील मोठी फूट पडली असून त्यात दोन गट पडले आहेत.  त्यामुळे विरोधात उभे असलेले अनंत गीते यांच्या पाठीमागे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने पाठीशी राहणा.र याचे चित्र हे त्या चार जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते यांच्याविरोधात रायगड लोकसभेचा किल्ला कोण सर करणार ?  याची याची प्रतीक्षा आता सगळ्यांना लागून राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading