Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवकालीन ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार?-भाजप

ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं

 

उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राज्याची चाकरी सुरू केली

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाकडून ट्विट करत प्रत्युत्तर

नोट बंदीमुळे पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांनी कमावलेलं घबाड उघडं पडलं असेल

राऊतांनी फुकाच्या गप्पा मारण्यापेक्षा पत्राचाळीत केलेल्या लुटीचा हिशेब द्यावा

भाजपनं ट्टिटवरुन संजय राऊत यांना काय प्रत्युत्तर दिलंय पाहुयात

ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं नाणं, शिवप्रेमींच्या ह्रदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही. याचा विसर संजय राऊत यांना पडला आहे.
उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राज्याची चाकरी सुरू झाली. त्यामुळे शिवरायांनी सुरू केलेल्या ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार? त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना राऊतांनी थोडा विचार करावा, उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे वागणं बरं नव्हं.

नोट बंदीमुळे मुंबईच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांनी कमावलेलं घबाड उघडं पडलं असेल, म्हणून राऊत यांना दोन हजार रुपयांची नोट आठवली असेल. राऊतांनी फुकाच्या गप्पा मारण्यापेक्षा पत्राचाळीतील मुंबईकरांच्या केलेल्या लुटीचा एकदा हिशेब द्यावा.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading