Loksabha Elections 2024 : काँग्रेसच्या जालना, धुळे येथील उमेदवारांची घोषणा
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची महाराष्ट्रातली तिसरी यादी जाहीर केली आहे, यात धुळे आणि जालन्याच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसने धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव आणि जालन्यातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये असलेली काँग्रेस महाराष्ट्रात 17 जागा लढवणार आहे, यातल्या 15 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली गेली आहे. आता काँग्रेसने फक्त मुंबईत लढणार असलेल्या दोन जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. धुळ्यात शोभा बच्छाव यांचा सामना डॉ.सुभाष भामरे यांच्याशी तर जालन्यात कल्याण काळे यांचा सामना रावसाहेब दानवे यांच्याशी होईल.
