Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मतं मिळविण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अकोल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं असंवेदनशील वक्तव्य नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहुयात

आमचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे लोकप्रिय खासदार श्री. संजय जी धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल असे अभद्र बोलून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

नाना, कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नका.

कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीनं वागू नका.

https://x.com/cbawankule/status/1776076188974522498

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading