होंडा बिग विंग पुणे ईस्ट येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे समजले जाते. शहरात विविध रुग्णालयांमध्ये आजही काही प्रमाणात रक्तपेठ्यांमधील रक्त साठा कमी पडू लागला आहे, अशा प्रसंगी युवकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व समजावे, त्यांना प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच सामाजिक बांधिलकी या नात्याने पाषाणकर ऑटो प्रायव्हेट लिमिटेच्या तिसऱ्या वर्धापन दिनी रक्तदान शिबिर राबविण्यात आले, यासाठी महिला व युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आ. रवींद्र धंगेकर, पाषाणकर ऑटो प्रा. लि. होंडा बिगविंग पुणे ईस्ट ढोले पाटील रोड चे व्यवस्थापक संतोष कुंडगिर,सेल्स हेड राकेश स्वामी अकाउंट डि रवी गारगोटे, प्रवीण रहाटे, रवी जगधने आदी उपस्थित होते. होंडा बिग विंग पुणे ईस्ट, ढोले पाटील रोड येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड ग्रुप, ब्लड प्रेशर तपासणी करण्यात आली.
यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले, सामाजिक उपक्रमात पाषाणकर ऑटो नेहमी अग्रेसर राहिलेले आहे, त्यांचं हे कार्य येणाऱ्या काळात आणखी जोमाने वाढेल असा विश्वास व्यक्त केला तसेच तिसऱ्या वर्धापन दिनाचा केक ही धंगेकरांच्या हस्ते कापण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
सह्याद्री ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले. शिबिरात २५ रक्त पिशवी संकलन करण्यात आले. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.
बिग विंग ईस्ट पुणे तर्फे नुकतीच बाजारात दाखल झालेली होंडा ची NX500 CC मोटर सायकल वितरित करण्यात आली.
