फिक्की महिला आघाडीच्या पुणे अध्यक्षपदी पिंकी राजपाल यांची निवड
पुणे : देशभरात फिक्की ही उद्योजकांची शिखर संस्था आहे .2023 ते 2024 या वर्षासाठी फिक्की पुणे च्या अध्यक्षपदासाठी पिंकी राजपाल यांची निवड करण्यात आली आहे .पिंकी राजपाल या पुणे शहरातील नामवंत उद्योजिका आहेत .त्यांना फिक्की च्या माजी अध्यक्षा रेखा सतीश मगर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नुकतीच प्रदान केली आहेत .
फिक्की ही संस्था महिला उद्यजिकांना एकत्र करून त्यांना विविध व्यवसाय मार्गदर्शन ,परिषदा तसंच उद्योगक्षेत्रातील विविध विषयाबाबत सहकार्य करण्याचे कार्य करीत आहे .
फिक्की महिला आघाडी उद्योग व्यवसायाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम ही राबवीत असते .नुकतेच फिक्की महिला आघाडीने पुणे जिल्ह्यातील अनेक गावे दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे .
या पुढेही अनेक नवीन महिला उद्योजिकांना यशस्वी उद्योजिका घडवण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे . तसेच समाजातील दुर्बल घटकातील महिलांना विविध प्रकारे मदत करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा पिंकी राजपाल यांनी सांगितले आहे .
