Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाचे मत महत्त्वाचे- सूर्यकांत येवले

पुणे : लोकशाही बळकट आणि प्रबळ करण्यासाठी प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून नवमतदारांनी येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासोबतच परिसरातील सर्व मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले यांनी केले.

कसबा विधानसभा मतदार संघात आप्पासाहेब जेधे महाविद्यालयात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या प्राचार्य, शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागांमध्ये स्वीप अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. विविध महाविद्यालयांमध्ये नवमतदार नोंदणी अभियान, पथनाट्य, रॅली, भित्तीपत्रकांचे प्रदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून जनतेच्या मनातील मतदान प्रक्रियेविषयी गैरसमज दूर करण्यासाठी ईव्हीएम यंत्राची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली असल्याचे श्री. येवले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी ‘मेरा पहला वोट देश के लिए’ अशा वाक्याचा ५० फूट लांबीचा कापडी फलक घेऊन रॅलीद्वारे युवकांना मतदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारे भित्तीपत्रकेही तयार केली होती. घोषवाक्य आणि पथनाट्य या माध्यमातूनही मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

पर्वती विधानसभा मतदारसंघातही जनजागृती
पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी शहरातील सातारा रोड, शिवदर्शन, सहकार नगर, सिंहगड रोड, अंबेधरा कॉलनी, भारती विद्यापीठ, सारस बाग,मित्र मंडळ,सिटी प्राइड,राजीव गांधी प्राणी संग्रहालय इत्यादी बस स्थानकांवर
मतदान जागृतीपर भित्तीपत्रके लावून मतदान जनजागृती करण्यात आली. पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मतदानाची शपथ देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading