Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे ‘हा’ उमेदवार जाहीर

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठो अकोल्यात काँग्रेसतर्फे कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच सोमवारी रात्री काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहिर झाली.  आम्हाला सात जागांवर पाठिंबा दिला तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली होती मात्र कॉँग्रेसने पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

भाजपाने पहिल्या टपप्प्यातील लोकसभा निवडणूकासाठी अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदारपुत्र अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहिर केली. दरम्यान महाविकास आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदार संघातून नामांकन सादर केले.  अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

तर गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली होती. अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असुन या मतदार संघातून त्यांनी दोनदा (1998 आणि 1999) लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading