Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने आता एकला चलो रेचा मार्ग निवडला असून, पहिली यादी जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. दुस-या यादीत ११ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर यांना, तर सोलापुरातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच माढ्यातून रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळ््यातून अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वंचित चे दुसऱ्या यादीतील उमेदवार 
हिंगोली : डॉ. बी. डी. चव्हाण
लातूर : नरसिंहराव उदगीरकर
सोलापूर : राहुल काशिनाथ गायकवाड
माढा : रमेश नागनाथ बारसकर
सातारा : मारुती धोंडिराम जानकर
धुळे : अब्दुल रहमान
हातगणंगले : दादासाहेब पाटील
रावेर : संजय ब्राम्हणे
जालना : प्रभाकर बकळे
उत्तर-मध्य मुंबई : अबुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : काका जोशी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading