संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत एसबीआय लाइफ आणि लखनऊ सुपर जायंट्सने एकाना क्रिकेट स्टेडियमवर लार्जर-दॅन-लाइफ ‘हेल्मेट’चे अनावरण केले
लखनौ : एसबीआय लाइफ इन्शुरन्सने, देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोबत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम येथे ‘लार्जर-दॅन-लाइफ’ हेल्मेटचे उद्घाटन केले. हे स्टेडियम लखनौ संघाचे होम ग्राउंड आहे. 27 फूट उंच आणि 34 फूट रुंद असलेले हे हेल्मेट स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आले आहे. जे क्रिकेट चाहत्यांचेच नाही तर शहरातील इतर नागरिकांचे देखील लक्ष वेधून घेते.
हे भव्य हेल्मेट ठेवण्यामागचा उद्देश हा जीवन विम्याची गरज आणि महत्त्व पटवून देणे आहे. यात मैदान तसेच मैदानाबाहेरील संरक्षणाचा समावेश आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अनोख्या हेल्मेटचा उद्देश ‘जीवन संरक्षण से बडा कुछ नहीं’ ही बाब लखनौकरांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यासाठी आयुष्यातील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक तजवीज करून एखाद्याच्या जीवाचे रक्षण करण्यावर भर दिला जातो.
‘लार्जर-दॅन-लाइफ’ हेल्मेटचे अनावरण ब्रँड प्रमुख, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, रवींद्र शर्मा यांच्यासह सलमानताज जाफर ताज पाटील, डीसीपी ट्रॅफिक, लखनौ, श्री. कमलेश कुमार दीक्षित, डीसीपी महिला गुन्हे सुरक्षा, लखनौ, राहुल राही, प्रादेशिक संचालक- लखनौ, SBI लाइफ इन्शुरन्स आणि केशव महाराज, LSG खेळाडू इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लखनऊ सुपर जायंट्सच्या हेल्मेटचे अधिकृत भागीदार असल्याने, क्रिकेटच्या मैदानावरील हेल्मेटचे संरक्षणात्मक कार्य आणि व्यक्ती तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या आयुष्यातील आर्थिक भविष्याचे रक्षण करण्यासाठी विम्याची महत्त्वपूर्ण भूमिका यांच्यातील समानता अधोरेखित करण्याचे SBI लाइफचे उद्दिष्ट आहे. ज्याप्रमाणे हेल्मेट खेळाडूचे मैदानावरील कोणत्याही हल्ल्यापासून वाचवते, आणि त्यामुळे खेळाडू आत्मविश्वासाने खेळू शकतील आणि विना ताण त्यांच्या संघाचे लक्ष्य साध्य करू शकतील, त्याचप्रमाणे, जीवन विमा व्यक्तीच्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करते. तसेच एखादी अप्रिय घटना घडल्यास विम्यामुळे प्रियजनांच्या गरजा देखील पूर्ण करता येतात.
या उपक्रमाविषयी बोलताना, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआरचे ब्रँड प्रमुख श्री. रवींद्र शर्मा म्हणाले, “संरक्षणाची संकल्पना क्रिकेट रसिकांसमोर सादर करत एकाना स्टेडियमवर ‘लार्जर-दॅन-लाइफ’ अशा प्रचंड हेल्मेटची स्थापना करण्यात आली. हा लखनौकरांना एक प्रभावी संदेश आहे. ‘लाइफ के संरक्षण से बडा कुछ नहीं’ या संदेशाचे हे प्रतीक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणे, हा आमच्या ब्रॅण्डचा उद्देश आहे, तोच या मोहिमेतून समोर येतो. क्रिकेट हा निव्वळ खेळ नाही तर ते त्याहीपलीकडे आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भावनिक घटकांचा परस्परसंवाद आहे. या खेळामुळे आणि त्याच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारामुळे चाहत्यांना संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही एक मोठीच संधी आहे. विम्याच्या वर्तमान दरासह सुरक्षित आर्थिक भविष्य निर्माण करण्यासाठी विम्याची गरज आणि महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. LSG सोबतचे आमचे सहकार्य देशभरातील क्रिकेट रसिकांसोबत अर्थपूर्ण सहभाग वाढवण्याचा आणि त्यांची आवड जोपासण्यासाठी त्यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, ही भागीदारी विमा आणि हेल्मेटचे महत्त्व यांच्यातील साम्य दर्शवते. मैदानावर तसेच मैदानाबाहेरील संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. लखनऊ सुपर जायंट्ससह आमच्या प्रवासाबद्दल आम्ही रोमांचित आहोत आणि या सीझनमध्ये त्यांची कामगिरी उत्साहवर्धक असेल, अशी अपेक्षा करतो. देशभरात विमा जागरुकतेला सातत्याने चालना देत असल्याने आपल्या जवळच्यांचे आयुष्य विम्याने सुरक्षित करण्याचे हे प्रयत्न सत्यात उतरतील याची आम्हाला खात्री आहे.”
क्रिकेटमधील सर्वात महत्त्त्वाचे असलेले हेल्मेट हे SBI लाइफला संरक्षण आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करते. देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक विलक्षण संधी आहे. ज्याप्रमाणे हेल्मेट खेळाडूला मैदानावरील धोक्यांपासून वाचवते, त्याचप्रमाणे आयुर्विमा आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासोबतच स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास एखाद्या व्यक्तीला सक्षम बनवतो.
