Lok Sabha Election 2024 : वसंत मोरे व अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट; नवीन राजकीय समिकरणाला सुरूवात
मुंबई : पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी आज वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतानाअ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या काही दिवसात नवीन राजकारणाची सुरूवात होणार आहे, असे सांगत मोरे यांच्याशी झालेली बैठक सकारात्मक झाल्याचे स्पष्ट केले आहे.
वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आज अपक्ष उमेदवार वसंत मोरे हे सकाळीच अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचले. पुण्यामधून आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढत असून आपल्याला वंचिटने पाठिंबा दर्शवावा, यासाठी मोरे यांनी विचारणा केली आहे. जवळपास आर्धातास झालेल्या चर्चे नंतर या दोघांनीही माध्यमांशी एकत्रित संवाद साधला.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक झाली आहे. मात्र, 31 मार्च नंतर आम्ही आमची अधिकृत भूमिका स्पष्ट करू. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरू आहेत. अनेक नवीन राजकीय समिरणं येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच लवकरच आपण दुसरी उमेदवार यादी देखील जाहीर करू, असे देखील आंबेकरांनी सांगितले.
दरम्यान, वसंत मोरे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे वंचित मोरेंना पाठिंबा देतो का? किंवा मोरे वंचितच्या तिकिटावर लढणार का? या चर्चा होवू लागल्या आहेत.
