लहान मुले, प्रशिक्षकांव्दारे हॉकीचा प्रचार आणि प्रसार झाल्यास भारतामध्ये हॉकीला सुगीचे दिवसः फ्लोरिस जॅन बोवेलँडर
पुणे : मुलांना खेळण्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि तरच हॉकी खेळाचा विकास होईल. खेळाच्या विकासासाठी हॉकी इंडिया लीगचे पुनरूज्जीवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुले, प्रशिक्षक इत्यादी मार्फत हॉकीचा प्रचार आणि प्रसार झाल्यास भारतामध्ये हॉकीला सुगीचे दिवस येतील, अशी आशा आहे, असे मत अटलांटा गेम्स् ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते, विश्वविजेते आणि ९० च्या दशकातील महान डच हॉकीपटू फ्लोरिस जॅन बोवेलँडर यांनी व्यक्त केले.
फ्लोरिस हे रोटरी पुणे स्पोटर्स सिटी यांच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी रोटरी पुणे स्पोटर्स सिटीचे नितीन जोशी आणि संदेश सावंत उपस्थित होते. फ्लोरिस जॅन बोवेलँडर हे १९९६ च्या अटलांटा गेम्स् ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते, विश्वविजेते आणि ९० च्या दशकातील महान डच हॉकी संघाचे सदस्य होते.
बोव्हेलेंडर यांचे भारतावर मनापासुन प्रेम असून त्यांनी अनेक वेळा भारतातील विविध शहरांना भेट दिली आहे. भारतामध्ये तळागाळातील स्तरावर हॉकी क्रीडाप्रकाराचा विकास करणे तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा दुर्बल असणार्या मुलांना संधी मिळवून देण्याचे त्यांचे उद्दीष्टय आहे. बोव्हेलँडर फाऊंडेशन या त्यांच्या सामाजिक संस्थेव्दारे हे कार्य करत आहेत.
फ्लोरिस पुढे म्हणाले की, भारताने हॉकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिले आणि मुलांना हॉकी मैदानांवर सहज प्रवेश मिळवा किंवा त्यांना हॉकीच्या सुविधा मिळाव्यात. हॉलंड सारख्या लहान देशात जवळपास १२ हजार टर्फ हॉकी खेळपट्टया असून ज्या लहान मुलांसाठी सहज उपलब्ध आहेत. भारतामध्ये या तुलनेने ही सुविधा अतिशय कमी प्रमाणात आहे. भारतात मुलांसाठी अधिक टर्फ खेळपट्ट्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
हॉलंडमध्ये मुलांसाठी टर्फ पिच मोठ्या संख्येने आणि सहजपणे उपलब्ध असतात. मुले सहजपणे चालत किंवा सायकल चालवत टर्फ पिचवर जातात, हॉकी पिचची एवढी सहज उपलब्धतात हॉलंडमध्ये आहे. हॉकीच्या उन्नतीसाठी भारतामध्ये असे चित्र निर्माण करणे गरजेचे आहे.
भारतात हॉकी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यासोबतच, पाण्याची गरज असलेल्या हॉकी खेळपट्ट्यांच्या तुलनेत वाळूमिश्रित खेळपट्ट्या अधिक असणे जास्त फायद्याचे ठरणार असल्याचे बोव्हलँडर म्हणाले. वाळूवर आधारित हॉकी खेळपट्ट्यांना माझा अधिक पाठींबा असेल. कारण त्यांना पाण्याची गरज नाही. भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये पाण्याची खरी गरज मैदानांऐवजी शेतीसाठी प्राध्यान्याने आहे. त्यामुळे टर्फ मैदानांवर पाणी घालवण्याऐवजी वाळूवरील हॉकी खेळपट्ट्या अधिक सोयिस्कर ठरतील.
इंडिया हॉकी लीगबाबत बोलताना ते म्हणाले की, इंडिया हॉकी लीगने भारतीय हॉकीच्या विकासात मोठी भूमिका बजावली असून भारतीय हॉकीचा दर्जा उच्च स्तरावरचा आहे. टोकियो ऑलिंपिक मध्ये पुरूषांचे कांस्यपदक आणि मुलींनी मिळवलेले चौथे स्थान, यामुळे भारतीय हॉकी उत्तम प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुर्दैवाने भारतीय महिला पॅरीससाठी पात्र ठरल्या नाहीत. पण भविष्यामध्ये हे चित्र बदल्याचे नक्कीच पहावयास मिळेल.
बोव्हेलँडर फाऊंडेशन ध्येयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, बोव्हेलँडर फाऊंडेशन ज्या क्षेत्रातील लोकांना आणि ज्यांना संधी मिळत नाही अशांसाठी चांगल्या जीवनासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे. या हॉकी कार्यक्रमाव्दारे मुले, तरूण, प्रौढ आणि अशा समुदयांना एकत्र आणणे, तसेच त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि क्रीडा आणि शैक्षणिक विकासात मदत करण्याचा आमचा हेतु आहे.
