Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok Sabha Election 2024 : डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील आमने – सामने, पहा काय घडलं !

पुणे : लोकसभा निवडणुकी जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय तापमान वाढले असून विरोधी पक्षाच्या उमेदवारावर टीका करण्याकडे सगळ्याच उमेदवारांचा कल आहे. मात्र आज शिवनेरी किल्ल्यावर एक वेगळेच चित्र दिसले.  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही किल्ले शिवनेरीवर एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. इतकेच नव्हे तर यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर जात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतात. अनेकां प्रमाणेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही किल्ले शिवनेरीवर  महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक दोघे एकमेकांसमोर आले.  यावेळी दोघांमध्ये काहीवेळासाठी बातचितही झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

‘शिवसंस्कार’ हाच आमचा पिंड – डॉ. अमोल कोल्हे

शिवनेरी किल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे भेटल्यावर कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले. यावरून माध्यमांनी प्रश्न विचारला असता डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, राजकारण हा माझा पिंड नाही, शिवसंस्कार हाच माझा पिंड आहे. अन् मोठ्यांना नमस्कार करणे हेच आमचे संस्कार आहेत.

 

 

 

Leave a Reply