Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात युवा संवाद कार्यशाळा संपन्न

पुणे: – राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे व उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४ रोजी विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात युवा संवाद कार्यशाळा संपन्न झाली. युवकांनी अध्यात्म आणि विज्ञान यांचा ताळमेळ साधून भारत विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच भारत देश २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनेल असे या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले बी. एम. सी. सी. महाविद्यालय पुणे येथील डॉ. प्रशांत साठे यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधतांना सांगितले.

कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वयंसेवकांना विकसित भारत करण्याकरिता प्रयत्न करा असे आवाहन केले तर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद रवींद्र शिंगणापूरकर यांनी स्वयंसेवकांना विकसित भारत @ २०४७ ही संकल्पना समजावून सांगितली. या कार्यशाळेस पुणे शहरातील विविध महाविद्यालयातील २०० रासेयो स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेत सहभागी स्वयंसेवकांनी उपस्थित वक्त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नाचे योग्य निराकरण डॉ. प्रशांत साठे, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर आणि रवींद्र शिंगणापूरकर यांनी केले.युवाकेंद्री विचारांच्या प्रसारासाठी आयोजित कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत रासेयो संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले आणि सूत्रसंचालन रासेयोचे जिल्हा समन्वयक डॉ. अमित गोगावले यांनी केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading