सनी लिओनीने आंतरराष्ट्रीय कलाकार मार्शमेलोसोबत केलं खास कोलॅब !
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कलाकार मार्शमेलोच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री आणि उद्योजक सनी लिओनीने एक खास गोष्ट केली आणि तिने डीजेची भूमिका बजावली. 20,000 हून अधिक लोकांच्या उत्साही वातावरणात ग्रॅमी पुरस्कार विजेत्यासोबत ही अभिनेत्री व्यासपीठावर दिसली.
होळीच्या अगोदर आयोजित करण्यात आलेली ही मैफिल खास ठरली. चाहत्यांच्या आश्चर्यात भर घालणारी सनी होती जी मार्शमेलोसोबत ‘बेबी डॉल’, ‘मेरा पिया 2.0’ आणि आणखी बरेच काही प्ले करण्यासाठी स्टेजवर सामील झाली आणि तिने गर्दीला भुरळ पाडली. जेव्हा सनी लिओनीने माश्मेलोचा मास्क घातला तेव्हा संध्याकाळ खास झाली.
विशेष म्हणजे ही संधी मिळवणारी ती शॉन मेंडिसनंतरची दुसरी कलाकार आहे. आंतरराष्ट्रीय संगीत निर्माता मार्शमेलोच्या सनी लिओनसोबतच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव दिला. या वर्षी तिने नॉन-स्टॉप शूटिंग केल्यामुळे अभिनेत्रीसाठी हा एक योग्य ब्रेक होता. वर्क फ्रंटवर, अभिनेत्रीकडे ‘Splitsvilla X5’ आहे. ती ‘ग्लॅम फेम’ या रिॲलिटी शोला जज करतानाही दिसणार आहे. सनीला अनुराग कश्यपचा बहुप्रतिक्षित ‘केनेडी’ आहे, जो रिलीज होण्याच्या तयारीत आहे. तिचा ‘कोटेशन गँग’ हा तमिळ चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे.
