Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक आघाडी; वंचितचा महाविकास आघाडीशी काडीमोड?

अकोला : गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  हे महाविकास आघाडी सोबत जाणार की नाही? याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi)  अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेत, ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्या सोबत सामाजिक आघाडी करत असल्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुक 2024 साठी पहिली यादी देखील जाहीर केली आहे.

काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर आज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेवून ही घोषणा केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसी बहुजन पार्टी सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

निवडणूक लढवण्यास जरांगे पाटलांचा नकार 

प्रकाश आंबेडकरांनी वांचीतच्या एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, जाळण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. तर त्याबदल्यात त्यांचा उमेदवार ते 30 एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं.

https://x.com/VBAforIndia/status/1772879169237536989?s=20

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading