Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषिजी महाराजांचे दर्शन

 

पुणे – चिंचवड स्टेशन जैन स्थानकात क्रस्ना डायग्नोस्टिक लि. चे चेअरमन राजेंद्र मुथा द्वारा आयोजित होळी चातुर्मास ते आचार्य आनंद ऋषिजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर पू. प्रवीणऋषिजी यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुन राजेंद्र मुथा यांनी केले. दादांच्या स्वागताकरीता यावेळी उद्योजक रवी जैन, सुनील नहार, सचिन नहार, शेखर नहार , राजेश नहार, यश मुथा, माणिक मुथा, पिंपरी चिंचवड सकल जैन समाजाचे पदाधिकारी प्रा. अशोक पगारिया, सुभाष ललवाणी, जयप्रकाश राका, नितीन बेदमुथा, राजेश मुनोत, छगनलाल मुथा, विजय गांधी, जवाहर मुथा, मनोज सोलंकी, किरण रांका, आनंद पगारिया, नेनसुख मांडोत, निलेश नहार, नंदकुमार लुणावत, रमेश कटारिया, अशोक लुंकड, संतोष लुंकड, विजय लुंकड, श्रवण मुथा आदी मान्यवर व समाजातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सकल जैन समाजाच्या वतीने दादांचा सन्मान जयप्रकाश राका व मान्यवरांनी केला.

चिचोंडी (पाथर्डी) येथे ३५ एकर जागेवर साकारल्या जात असलेल्या “आनंदतीर्थ” या प्रकल्पाची माहिती संस्थेचे विश्वस्त सुनील नहार यांनी सविस्तररित्या यावेळी पवार यांना दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading