१४ वी ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० : दादाज् इलेव्हनचा सलग दुसरा विजय; साची सुपर किंग्ज् संघाने उघडले गुणांचे खाते
१४ वी ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा
पुणे : लायन्स् इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ तर्फे आयोजित १४ व्या ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत दादाज् इलेव्हन संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. साची सुपर किंग्ज् संघाने पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.
सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर जाधव याच्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर दादाज् इलेव्हनने जाधव नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना जाधव नाईट रायडर्सने १६९ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये विपुल जेऊरकर याने ८९ धावांची तर, अजित पाटील याने ५२ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना सागर जाधवच्या नाबाद ७३ धावांमुळे दादाज् इलेव्हनने हे लक्ष्य १९.३ षटकात पूर्ण केले.
गौरव बाबरच्या ६९ धावांमुळे साची सुपर किंग्ज् संघाने कोकणे स्टार्सचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोकणे स्टार्सने १७५ धावा अशी विशाल धावसंख्या उभी केली. अनिकेत शिर्के (नाबाद ५५ धावा), कुणाल शिंदे (३० धावा) आणि योगेश भोंगळे (३९ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. साची सुपर किंग्ज्च्या गौरव बाबर (६९ धावा) आणि देवदत्त देवकर (४६ धावा) यांच् या फलंदाजीमुळे संघाने अखेरच्या षटकात विजय मिळवला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जाधव नाईट रायडर्सः २० षटकात ३ गडी बाद १६९ धावा (विपुल जेऊरकर ८९ (५६, ९ चौकार, ४ षटकार), अजित पाटील ५२ (४०, २ चौकार, ४ षटकार), जयराज गौड २-२९) पराभूत वि. दादाज् इलेव्हनः १९.३ षटकात ८ गडी बाद १७० धावा (सागर जाधव नाबाद ७३ (३७, ७ चौकार, २ षटकार), विनय निंबाळकर २१, अजित पाटील ३-२२, भुपेंद्रसिंग धुल्लट २-२६); सामनावीरः सागर जाधव


