ओजी इन्फ्लुएंसर मालिनी अग्रवाल हीच अजून एक पुस्तक झालं प्रकाशित
मालिनी अग्रवाल ओजी इन्फ्लुएंसर म्हणून ओळखली जाते. कायम फॅशन , ट्रॅव्हल आणि अनेक गोष्टीतून ती कायम चर्चेत असते आणि अश्यातच तिने तिचं स्वतःच अजून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. ” अंडर द इन्फ्लुएन्स: हाऊ टू सर्व्हायव्ह अँड थ्राइव्ह ऑनलाइन” या तिच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
सर्वाधिक विक्री करून तिने पुन्हा एक पुस्तक लिहिलंय. “अंडर द इन्फ्लुएंस” मध्ये मालिनी ने अनेक विषयावर लिहिलं आहे तिचे अनोखे ब्लॉग आणि डिजिटल विश्व या बद्दल तिने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. मिसमालिनीच्या संस्थापक म्हणून तिचा इंडस्ट्रीत दबदबा असताना तिच्या नव्या पुस्तकाने पुन्हा एकदा ती चर्चेत आहे. डिजिटल क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मालिनी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
अनेकांनी तिला प्रेरणा स्थान असल्याचं या निमित्ताने सांगितलं. तिच्या नव्या पुस्तका बद्दल म्हणताना मालिनी सांगते “माझ सोशल मीडिया बद्दल असलेलं प्रेम हे सगळ्यांना माहीत आहे. हे पुस्तक माझ्या ब्लॉगिंग विश्वाची गोष्ट तर सांगत असताना हे विश्व किती आव्हानाच आहे हे देखील सांगून जात” “अंडर द इन्फ्लुएंस: हाऊ टू सर्व्हायव्ह अँड थ्राइव्ह ऑनलाइन” हे बेस्टसेलर बनण्यासाठी तयार आहे !
