Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात द्राक्षांची आरास

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीपौर्णिमेनिमित्त सुमधूर व रसाळ द्राक्षांची मनमोहक आरास करण्यात आली होती. पंढरपूर येथील दत्तभक्त व द्राक्ष बागायतदार प्रकाश कुलकर्णी यांनी सुमारे १५१ किलो द्राक्षे श्री दत्त महाराजांचरणी अर्पण केली.

दत्त मंदिरासमोरील प्रांगणात विश्वस्तांचे हस्ते होलिकापूजन झाले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त राजू बलकवडे उपस्थित होते. होलिकापूजनानंतर दत्त महाराजांची सायं आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष खामकर व त्यांच्या पत्नी स्मिता खामकर, विराज खामकर तसेच विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचे हस्ते संपन्न झाली. पौर्णिमेनिमित्त श्री दत्तयाग ॲड. शरद तुकाराम बांदल यांच्या तर्फे संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading