नू.म.वि. मुलींच्या प्रशाळेत अटल टिंकरींग लॅबचे उद्घाटन
पुणे : नू.म.वि. मुलींची प्रशाला व क.म.वि. येथे अटल ‘टिंकरींग लॅबचे उद्घाटन शि.प्र. मंडळीच्या एस. पी. कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. सुनील गायकवाड सर आणि शि .प्र. मंडळीचे रजिस्ट्रार मा. श्री. मंदार उपासनी सर यांच्या हस्ते झाले. या वेळी रुईया मूकबधीर विद्यालयाच्या प्राचार्य मा. संगीता शिंदे मॅडम, शि.प्र. मंडळीचे इस्टेट मैनेजर मा. श्री. नितीन राख सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.संगीता कांबळे मॅडम, पर्यवेक्षिका मा. वर्षा गुमास्ते मॅडम, अटल टिंकरींग लॅबच्या प्रमुख सौ आरती टोके , प्रशाला व कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी प्रशालेतील 9वी A च्या विद्यार्थिनींनी लॅबमधील उपकरणासंबंधीची प्रात्यक्षिके सादर केली. सर्व उपस्थितांनी विद्यार्थिनींचे खूप कौतुक केले.
