Loksabha eloction 2024 : कॉँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 4 उमेदवार
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत विविध राज्यातील 46 उमेदवारांची नावे आहेत. वाराणसीतून काँग्रेसने पुन्हा अजय राय यांना पीएम मोदींविरोधात उभे केले आहे. राजगडमधून दिग्विजय सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. तर या यादीत महाराष्ट्रातील चार जागांचा समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली, ज्यामध्ये राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून यांना मिळाली उमेदवारी
रामटेक (अनुसूचित जाती : रश्मी श्यामकुमार बर्वे
नागपूर : विकास ठाकरे
भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे
गडचिरोली चिमूर (अनुसूचित जमाती) : नामदेव किरसान
या आधी जाहीर झालेले 7 उमेदवार
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी (मुलगा)
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ शिवाजीराव कलगे
