Loksabha Election : कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांचा समावेश होता. आता काँग्रेस आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 57 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी स्क्रीनिंग समिती 2 दिवस उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करत होती. त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. मात्र, तिसऱ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही यादी तयार करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अरुणाचल प्रदेशात 2 जागा, गुजरातमध्ये 11 जागा, कर्नाटकात 17 जागा, महाराष्ट्रात 7 जागा, राजस्थानमध्ये 6, तेलंगणात 5 जागा, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीतील एका जागेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कॉँग्रेसचे महाराष्ट्रातील उमेदवार :
अमरावती – बळवंत वानखेडे
सोलापूर – आमदार प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आमदार रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ शिवाजीराव कलगे
