Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण ! 

 अभिनेता तुषार कपूर प्रशंसित निर्मात्या प्रेरणा अरोरा हिचा ओटीटी चित्रपट ” डंक – वन्स बिटन ट्वीस शाय ” मध्ये मुख्य भूमिका साकारणार असून हा अभिनेता अजिंक्य हे पात्र साकारून वकिलाची भूमिका साकारणार आहे. तुषार कपूरसाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खास ठरणार आहे. तुषार हा बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि आता या नव्या चित्रपटात तो काय जादू करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

 ‘डंक’ बद्दल बोलताना प्रेरणा म्हणते ” डंक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट ठरणार आहे.एक समाज म्हणून आपण जमीन बळकावण्याच्या या धोक्याविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना सशक्त आणि संरक्षण देणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे.

 उत्तम कथानक आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोरा ने ‘रुस्तम’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, राष्ट्रीय विजेते ‘पॅड मॅन’, ‘परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण’ यासारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. तुषार कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आदी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘डंक’ व्यतिरिक्त, प्रेरणा अरोरा तेलगू चित्रपट ‘हीरो हिरोइन’ची निर्मिती करत आहे ज्यात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading