Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा आय एम ए तर्फे सत्कार 

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे द्वारा  मेधा कुलकर्णी यांचा राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल खास सत्कार करण्यात आला. आय एम ए च्या वार्षिक पुरस्कार सोहळा व फायनॅंनशिअल डायरीचा अनावरण समारंभ यात प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. आय ए म ए च्या कार्याची स्तुती करत कोणतीही अडचण असल्यास सर्व डॉक्टरानी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्ष डॉ. राजू वरयाणीचेअरमन डॉ. भूतकरकार्यकारी विश्वस्त डॉ.संजय पाटील व डॉ. जयंत नवरंगे यानी आपले विचार मांडले. सचिव डॉ. गीतांजली शर्मा यानी आपल्या कवितेतून खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे अभिनंदन करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

डायरी चेअरमन डॉ. संजय देशमुखडॉ. सुमित शहाउपाध्यक्ष डॉ. इंगळे यांनी या वर्षीच्या डायरीविषयी व कॅंसर जनजागृती विषयी विचार  मांडले. आय एम ए पुरस्कार सोहळ्यात  डॉ. दिलिप सारडा यांना आय एम ए चा जीवनगौरव पुरस्कारडॉ. माया तुळपुळे याना आय एम ए  समाजकार्य पुरस्कारडॉ. सुरेखा शिंदे यांना डॉ. एम.जी. शहाडे पुरस्कार व डॉ. परीक्षित प्रयाग याना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार्थीनी आय एम ए सोबत सतत कार्य करत आय एम ए च्या सामाजिक कार्यात सहभागी राहण्याची ग्वाही दिली. सचिव डॉ. सचिन लकडे यांनी आभार मानले. आय एम ए चे सर्व पदाधिकारी व पुण्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading