Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सोलरमुळे विजेची बचत होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लागेल – आमदार सुनील टिंगरे

पुणे : सोलर सिस्टीम बसविल्यामुळे विज निर्मिति मधे हातभार लागुन देशाला विज खरेदी करण्यासाठी जो भार सहन करावा लागतो तो भार कमी होऊन विजेची बचत होईल आणि देशाच्या प्रगतीत आपला सहभाग होईल व हातभार लागेल असे मत सनसिटी सोसायटी व सुर्याटेक सोलर सिस्टीम यांच्या वतीने आयोजित ९० कीलोवॅट सोसायटी सोलर सिस्टीम उद्घाटन प्रसंगी वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले .

वडगाव शेरी येथील सन सिटी सोसायटी – ‘प्लेटिनम’ मधील चार इमारतींवर सुर्याटेक कंपणीच्या वतीने नव्वद कीलोवॅट सोलर सिस्टीम्स बसविण्यात आले. या सिस्टीम साठी बेचाळीस लाख ख़र्च करण्यात आला व ही सिस्टीम महावितरण ने कमीत कमी वेळेत मंजूरी देवून फक्त ४६ दिंवसात बसाविण्यात आली आहे. यामुळे सोसायटीचे ३६० युनिट प्रति दिन व १.७५ प्रती माह रूपयाची बचत होणार आहे. शिवाय सोसायटीच्या सामाईक भागातील लाइटला स्वस्तात वीज मिळणार आहे .या सोलर सिस्टीमचे उद्धघाटन आमदार टिंगरे व महावितरणचे अधिक्षक अभियंता डॉ. नीलेश रोहनकर यांच्या हस्ते करण्यात आले .

या समयी सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे, सोसायटीचे अध्यक्ष दीप कुमार , सुर्याटेक चे महा संचालक मुकुंद कमलाकर सोसायटीचे सचिव दत्ता वागस्कर ,संचालक सचिन चौधरी,अक्षय अमोलिक यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या पीएम सूर्यधर योजना अंतर्गत सोलर सिस्टीम साठी मोठ्या स्वरूपात अनुदान देण्यात येते यामुळे शहरी भागात विज निर्मिती मोठया प्रमानावर होऊन देशाच्या विज निर्मितीमधे हातभर लागणार आहे. यामुळे मी यावेळी सर्व पुणे कारांनी योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन महावितरण अभियंता डॅा .निलेश रोहनकर यांनी केले . सुर्याटेक संस्थेचे महासंचालक मुकुंद कमलाकार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात एक लाख ग्राहक आहेत. सूर्याटेक कंपनीचे स्वतंत्र ॲप आहे त्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे . ही सोलर सिस्टम चार बिल्डिंग वरती बसाविण्यात आली आहे प्रत्येकी १५ कीलोवॅट पैनल बसाविण्यात आले आहे तसेच कॉमन मोटर साठी ३० कीलोवॅट संयंत्र बसाविण्यात आले आहे . यामुळे रोज याठिकाणी तीनशेसाठ यूनिट पावने दोन लाख रुपये यामुळे बचत होणार आहे. ही माहिती सुर्याटेक संस्थेचे संचालक सचिन चौधरी यांनी दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना मोनिका सरडा यांनी केले तर वागस्कार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading