भारतीय शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर्सने ‘जोश का स्वर्ण उत्सव’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली
मोहाली – महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्सने सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत ‘जोश का स्वर्ण उत्सव’ या देशव्यापी व्हॅन मोहिमेची अभिमानाने सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे स्वराज ट्रॅक्टर्स ब्रँड्सच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे अभिनव पद्धतीने आभार मानतो आहे. तसेच देशभरातील शेतकऱ्यांसोबतचे मजबूत संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वराज ट्रॅक्टरची नवीन श्रेणी – ‘नया स्वराज’ सादर करत आहे.
उत्तर भारतापासून सुरुवात होऊन देशभरात पसरलेल्या 50 वर्षांच्या प्रवासाचे आणि ग्राहकांना दिलेल्या उत्कृष्टते सेवेचे प्रतीक म्हणून, स्वराजने ‘जोश का स्वर्ण उत्सव’ मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि नवीन स्वराजची ओळख होण्यासाठी हा उपक्रम एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करेल.
स्वराज विक्री संघ, स्थानिक शेतकरी, चॅनेल भागीदार आणि प्रभावक यांना एकत्र आणून ट्रॅक्टर रॅली आणि ग्राहकांच्या भेटीसह या मोहिमेमध्ये अनेक रोमांचक कार्यक्रमांचा समावेश असेल. या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळेल, असा स्वराजला विश्वास असून यात 50,000 हून अधिक ग्राहकांशी थेट संपर्क साधला जाईल.
मोहाली येथील स्वराज ट्रॅक्टर्सच्या सर्वात जुन्या उत्पादन कारखान्यांपैकी एकातून ‘जोश का स्वर्ण उत्सव’ मोहिमेला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का यांनी हिरवा झेंडा दाखवला. सिक्का यांनी यावेळी एखादा आनंद साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. आमच्या आजवरच्या प्रवासात शेतकऱ्यांच्या मदतीचा, योगदानाचा आम्ही सन्मानच करतो. ‘स्वराज’च्या यशामागे या शेतकऱ्यांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची मदत आणि सक्षमीकरण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणजे हा सुवर्णमहोत्सवी उत्सव.”
हरीश चव्हाण, सीईओ – स्वराज विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, स्वराज आणि त्यांच्या ग्राहकांमधील नात्याबाबत म्हणाले, “स्वराजमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांचा अतूट विश्वास आणि निष्ठा अनुभवायला मिळाली. त्यामुळेच ‘जोश का स्वर्ण’ म्हणजे आमच्या यशात शेतकरी आणि शेतकरी समुदायांनी दिलेल्या योगदानाचा गौरव आणि आभार मानणारी मोहीम आहे. नवीन स्वराजमार्फत आम्ही शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू ठेवत त्यांच्याशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्याची आकांक्षा बाळगतो.”
मोहिमेदरम्यान, स्वराजचे नवीन ट्रॅक्टर आणि शेती उपकरणांची नवीनतम श्रेणी प्रदर्शित करेल, तसेच शाश्वत शेती पद्धतींबद्दल जागरूकता वाढवण्याच्या संधीचाही उपयोग करून घेईल.
