रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लि. ने १२ कोटी अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीसाठी एजी डायनॅमिक फंड्स लि यांच्याशी केला सामंजस्य करार
पुणे : पायाभूत सोईसुविधा क्षेत्रातील पुण्यातील आघाडीची कंपनी रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड (आरएसआयआयएल) ने बारा कोटी अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीसाठी प्रतिष्ठेच्या एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. हे धोरणात्मक सहकार्य म्हणजे आरएसआयआयएलच्या एक अब्ज डॉलरचे लक्ष्य गाठण्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या उभ्या राहिलेल्या गुंतवणुकीमुळे वाढीला गती मिळेल तसेच आरएसआयआयएलची बाजारपेठेतील उपस्थिती बळकट होईल. आरएसआयआयएल ही पायाभूत सोईसुविधा क्षेत्रातील उच्च दर्जाचे सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यात गुंतलेली असून रस्ते बांधणी आणि विकास यावर तिचा खास भर आहे.
एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड हा मॉरिशसमधील भारतावर केंद्रीत असलेला निधी आहे. त्याद्वारे प्राथमिक (आयपीओपूर्वी आणि आयपीओ) आणि दुय्यम अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये गुंतवणूक केली जाते. आरएसआयआयएलने तिच्यावर एनएचएआयने गुजरात राज्यात सोपविलेले ४००० कोटीचे काम पूर्ण केल्यानंतर ही गुंतवणूक आली आहे. त्यामुळे कंपनीचे ऑर्डर बुक ९००० कोटीवर गेले आहे.
या नव्या आर्थिक साह्यामुळे कंपनीला अधिक व्यापक प्रकारचे प्रकल्प हाती घेता येतील. तसेच प्रभावशाली महसूल मिळविण्याच्या दिशेने ती त्यांना पुढे घेऊन जाईल असा आरएसआयआयएलचा अंदाज आहे. कंपनीची उलाढाल २०२६ पर्यंत ५००० कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अनुमान आहे.
रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित गाढोके म्हणाले, “उद्योगातील लक्षणीय टप्पे गाठण्याच्या आमच्या प्रवासात एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड यांना महत्त्वाचा भागीदार म्हणून सोबत घेताना आम्हाला आनंद होत आहे.”
एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेडचे संचालक अश्वनी रामसुरम म्हणाले, “आरएसआयआयएलशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या वाढीच्या प्रवासात बारा कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सामंजस्य करार केला आहे. आरएसआयआयएलची संभाव्य क्षमता आणि पायाभूत सोईसुविधा क्षेत्राच्या प्रगतीबाबत आमचा समान दृष्टिकोन याचे प्रतिबिंब या सहकार्यातून पडले आहे. आमची भागीदारी सफल राहील आणि त्यातून दोन्ही कंपन्यांना उद्योगातील महत्त्वाचे टप्पे गाठण्यात पुढे जाता येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
आरएसआयआयएलमधील एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेडच्या गुंतवणुकीतून प्रगती आणि समृद्धीबाबत समान दृष्टिकोन अधोरेखित होतो. ही केवळ भांडवलाची गुंतवणूक नाही तर विश्वासाचा निलाफ आहे. उद्योगातील लक्षणीय टप्पे गाठण्याच्या दिशेने तो प्रवास आहे
