Loksabha Election 2024 : भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ‘या’ २० जणांचा समावेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतिय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, बीडहून पंकजा मुंडे तर पुण्याहून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून 20 उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने आज जाहीर केलेल्या सर्व लोकसभा मंतदारा संघात भाजपचेच खासदार होते. आता ज्या जागांचा तिढा आहे किंवा शिवसेना शिंदे गट किंवा आजिर पवारांच्या राष्ट्रवादी कडे आहेत त्या जागांच्या इच्छुकांना काही दिवस वात पहावी लागणार आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे लोकसभा उमेदवार
नंदुरबार- हीना गावित
धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील
