Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

अमृतांजन इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत दाखल

  • ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड

पुणे : आरोग्य देखभाल आणि वेलनेस उद्योगक्षेत्रातील नामांकित कंपनी अमृतांजन हेल्थकेयरने इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत दाखल केले आहे. हे इलेक्ट्रोलाईट पेय शरीरातील ऊर्जा पातळी पूर्ववत करून डिहायड्रेशन व थकवा दूर करते. त्यासोबतच अमृतांजनने इलेक्ट्रो+ चा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची निवड केल्याची देखील घोषणा केली आहे.

इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट सादर करण्याबरोबरीनेच अमृतांजनने भारतीय क्रिकेटमधील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडसोबत हातमिळवणी केल्याची देखील घोषणा केली आहे. खेळाप्रती ऋतुराजची निष्ठा आणि कायम सर्वोत्तम कामगिरी बजावण्याप्रती बांधिलकी आरोग्य आणि सक्रियतेला प्रोत्साहन देण्याच्या इलेक्ट्रो+ च्या मूलभूत मूल्यांना अतिशय अनुरूप आहे. ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऋतुराज गायकवाड इलेक्ट्रो+ चे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आणि एकंदरीत आरोग्यासाठी हायड्रेशन व इलेक्ट्रोलाईट संतुलनाला प्राधान्य देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

इलेक्ट्रो+ हे प्रभावी सेल-लेव्हल हायड्रेशन पुरवून इलेक्ट्रोलाईटची भरपाई करण्यासाठी तयार करण्यात आले असून शरीरातील सामान्य ऊर्जा पातळी पुन्हा मिळवून देऊन थकवा दूर करते. इलेक्ट्रो+ ब्रँडने ताजेतवाने करणाऱ्या लो शुगर पेयाचा पर्याय उपलब्ध करवून देऊन आरोग्याविषयी जागरूक ग्राहकांना प्राधान्य देण्याचे धोरण कायम राखले आहे.

अमृतांजन हेल्थ केयरचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री एस संभू प्रसाद म्हणाले की अमृतांजनमध्ये आम्ही आरोग्य व कल्याण यांना प्रोत्साहन देणारी अभिनव उत्पादने सादर करण्यासाठी वचनबद्ध आहोत. इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट आमच्या ग्राहकांच्या नवनवीन वाढत्या गरजा पूर्ण करण्याप्रती आमची निष्ठा दर्शवते. अमृतांजन परिवारात ऋतुराज गायकवाडचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की इलेक्ट्रो+ सोबत ऋतुराजचा सहयोग सर्व देशवासियांना प्रभावित करेल.

या सहयोगाविषयी भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड म्हणाले की इलेक्ट्रो+ ब्रँडसाठी अमृतांजन हेल्थकेयरसोबत भागीदारी करताना मला अतिशय आनंद होत आहे. हायड्रेशन आणि ऊर्जा कायम राखणे फक्त माझ्यासारख्या खेळाडूसाठीच नव्हे तर, प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी व एकंदरीत आरोग्यासाठी इलेक्ट्रोलाईटचे सुयोग्य संतुलन राखणे आवश्यक असते. तुम्ही मैदानावर खेळत असाल किंवा दररोजची कामे करत असाल तरी हे गरजेचे आहे. मला आनंद आहे की, यासाठीचा उपाय अमृतांजन इलेक्ट्रो+ ने आपल्याला उपलब्ध करवून दिला आहे. मला आशा आहे की, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्यास मूड, स्मरणशक्ती आणि एकाग्रता यांना चालना मिळते तसेच एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यात मदत होते.

इलेक्ट्रो+ चे रेग्युलर तसेच लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध आहे. थकवा दूर करून ऊर्जा स्तराची भरपाई करणाऱ्या, शरीर ताजेतवाने करणाऱ्या पेयाचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading